शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Sawant : "नकला आणि कलाविष्कारातील फरक समजण्यासाठी..."; काँग्रेसने ट्विट केला मोदींचा 'तो' Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 15:50 IST

Congress Sachin Sawant Slams BJP : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गट या दोन गटांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. टीका करण्यात दोन्ही गटाचे नेते आघाडीवर असल्याचे कायमच दिसून आले आहेत. प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप शिंदे गटाने ठाकरे गटातील नेतेमंडळींवर केला आहे. त्यामुळेच, राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटातील विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावरून काँग्रेसने आता भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 

काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच "भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाचे नीट अध्ययन केले असते तर शिवसेनेच्या भास्कर जाधव व इतर नेत्यांवर नकला केल्या म्हणून गुन्हे दाखल झाले नसते. नकला आणि कलाविष्कार यातील फरक समजण्यासाठी मोदीजींचा कलाविष्कार पाहणे गरजेचे आहे" असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदींच्या भाषणातील दोन व्हिडीओ क्लिप एकत्र केल्या आहेत. या दोन्ही व्हिडीओ क्लिपमध्ये मोदी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नक्कल करताना दिसत आहेत. पहिल्या क्लिपमध्ये मोदींनी राहुल गांधींची हाताच्या बाह्या वर सरकवण्याची नक्कल केली आहे. तर दुसऱ्या क्लिपमध्ये मोदी संसदेत भाषणादरम्यान राहुल गांधींची डोळा मारण्याची नक्कल करताना दिसत आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण