शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी महाराष्ट्रातील महिला अत्याचारही बोलावं"; काँग्रेसने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 19:01 IST

कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या विधानावरुन महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

Congress On President Droupadi Murmu : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावररुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या गोंधळावरूनही राष्ट्रपती मुर्मू यांनी भाष्य केलं होतं. समाजाला प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं होतं. राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने पलवटवार केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी महाराष्ट्रातील महिला अत्याचारही बोलायलं हवं असं परखड मत काँग्रेसने मांडलं आहे.

कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. देशभरात या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर संघटना आणि नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, देशाच्या राष्ट्रपती द्रौपद्री मूर्मू यांनी याप्रकरणी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रपती मुर्मूंनी दिलेल्या निवेदनावरुन  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाष्य केलं आहे. ते नागपुरात बोलत होते.

"केवळ कोलकाता नाही, तर राष्ट्रपतींनीही महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे. बदलापूर येथे जे घडले त्यामुळे महाराष्ट्रातील जनता व्यथित झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराचीही दखल घ्यायला हवी. त्या संपूर्ण राष्ट्राच्या राष्ट्रपती आहेत," असं रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू?

"कोलकाता येथील घटना वेदनादायक आणि भयावह आहे. बस आता खूप झालं. ज्यावेळी कोलकाता येथे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते, तेव्हा या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत होते. कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वत:ला कठीण प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. १२ वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मात्र, समाजाने याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येते, या संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना केला पाहिजे," असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूcongressकाँग्रेसbadlapurबदलापूर