सोलापूरमध्ये काँग्रेसच्या रॅलीवर दगडफेक
By Admin | Updated: September 28, 2014 02:28 IST2014-09-28T02:28:31+5:302014-09-28T02:28:31+5:30
शहर मध्यमधील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या रॅलीवर झालेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाल्याची शनिवारी दुपारी 12.3क् वाजता घडली़

सोलापूरमध्ये काँग्रेसच्या रॅलीवर दगडफेक
>सोलापूर : शहर मध्यमधील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या रॅलीवर झालेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाल्याची शनिवारी दुपारी 12.3क् वाजता घडली़ रोशनबी महंमदशरीफ पठाण (50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आसमा मुजावर हिच्यासह अन्य एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
दगडफेकीत जखमी झालेल्यांमध्ये गोवर्धन रामल्लू कमटम (44), सागर तिप्पण्णा आनंदकर (20), शुभांगी विश्वजीत लिंगराज, ज्योती नागनाथ वाघमारे (29), भारती महादेवी एक्कलदेवी (41), लक्ष्मी अजंप्पा आसादे (21) यांचा सामवेश आह़े रॅलीमध्ये प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा ज्योती वाघमारे सहभागी झाले होते. रंगभवन ते सात रस्ता मार्गावरील गरूड बंगल्याजवळ ही दगडफेक करण्यात आली़(प्रतिनिधी)