शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

मविआ सरकार कोसळताच शिवसेनेला आणखी एक धक्का; काँग्रेसचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 08:22 IST

‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्यांवर कारवाई होणार, सोनिया गांधी व राहुल यांची घेतली भेट

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकांच्या उमेदवाराला मतदान न करणाऱ्या व विश्वासमताच्या वेळी हेतुपुरस्सर गैरहजर राहिलेल्या आमदारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांना या संदर्भातील अहवाल सादर केला. या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. २० जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले हाेते. हंडोरे यांना पहिल्या पसंतीची मते न मिळाल्याने पराभव झाला. यासाठी काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची कबुली पटोले यांनी अहवालात दिल्याचे समजते. 

क्रॉस व्होटिंग व गैरहजर असलेले कॉमनविश्वास ठरावाच्या वेळी गैरहजर राहिलेल्या आमदारांच्या हेतूंवर संशय व्यक्त करण्यात आला. क्रॉस व्होटिंग करणारे व विश्वासमताच्या वेळी गैरहजर राहिलेले सात सदस्य कॉमन असल्याचेही नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले. गैरहजर राहिलेल्या काही सदस्यांनी पक्षाची पूर्वपरवानगी घेतली होती, असेही पटाेले यांनी सांगितले. 

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार मुंबई महापालिका निवडणूकमुंबई महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी असे मत नाना पटोले यांनी याआधीही मांडले होते. महाराष्ट्रात राजकीय गणिते बदलली आहेत. त्यानुसार काँग्रेसनेही रणनीतीत बदल करण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना