शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “अदानी प्रकरणाची चौकशी जेसीपीमार्फतच व्हायला हवी”; पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 11:08 IST

Maharashtra News: भाजपचे नेते हे राहुल गांधींना घाबरतात हेच यावरून दिसून येते, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Maharashtra Politics:अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीवरून विरोधकांमध्ये मतभिन्नता असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणाची चौकशी जेसीपीमार्फत नको तर निवृत्त न्यायमूर्तींमार्फत व्हायला हवी अशी भूमिका मांडली होती. मात्र, यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळे मत व्यक्त केले आहे. अदानी प्रकरणाची चौकशी जेसीपीमार्फतच व्हायला हवी, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. 

जेसीपी हे सत्य शोधण्याचे संसदेच्या हातातील प्रमुख शस्त्र आहे, असे ठाम मत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. बोफोर्स प्रकरणात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी हे स्वतः जेसीपी चौकशीला सामोरे गेले होते. इतकेच नव्हे तर केतन पारेख आणि हर्षद मेहता यांच्या घोटाळय़ांचा पर्दाफाशही खऱ्या अर्थाने जेसीपीमुळेच झाला होता. त्यामुळे यापूर्वीच्या चौकशांप्रमाणेच अदानी प्रकरणाची चौकशीही जेसीपीमार्फतच व्हायला हवी. तशी काँग्रेसची  मागणी आहे. २००३ मध्ये शीतपेयांमध्ये कीटकनाशकाचा अंश असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या चौकशीसाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जेसीपी स्थापन करण्यात आली होती. मी स्वतःदेखील त्या समितीचा सदस्य होतो. त्यातील सत्य उघड झाल्यानंतर शीतपेयांच्या उत्पादनासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली. जेसीपीने दिलेल्या अहवालामुळेच हे शक्य झाले होते, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

भाजपचे नेते हे राहुल गांधींना घाबरतात हेच यावरून दिसून येते

जगातील दुसरी श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानींच्या कंपन्यांमधील घोटाळा हिंडेनबर्ग अहवालामुळे बाहेर आला. टाळेबंदीमध्ये झालझोल करून शेअर्सच्या किमती कृत्रिमरीत्या वाढवून लोकांना सपशेल फसवले हे सत्यदेखील हिंडेनबर्गने जगासमोर आणले. या अहवालाला अदानी  कोणतेही ठोस उत्तर देऊ शकले नाहीत किंवा त्यांच्याविरोधात कारवाईदेखील झाली नाही. मात्र हे सत्य लोकसभेत मांडणारे राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी सरकारने टार्गेट केले असून त्यांची खासदारकी रद्द करण्यासाठी जंगजंग पछाडले. राहुल गांधी सत्य सांगत होते. सरकारच्या पायाखालची जमीन घसरली. भाजपचे नेते हे राहुल गांधींना घाबरतात हेच यावरून दिसून येते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

दरम्यान, अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेले २० हजार कोटी रुपये नेमके कुणाचे आहेत, असा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत विचारला. त्यांनी अदानींचे सत्य जगासमोर आणले, पण राहुल गांधींना लोकसभेत बोलूच दिले नाही. त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांची खासदारकीही रद्द केली. हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी यांना टार्गेट करण्यात आले. होय, कारण चोरांनाच टार्गेट केले जाते. अदानी प्रकरणाची चौकशी कशी करायची याबाबत विविध मते व्यक्त होत असली तरी त्यांची जेपीसी चौकशीच व्हायला हवी, अशी ठाम भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAdaniअदानीcongressकाँग्रेस