शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
2
शिक्षकांच्या छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रोसमोर उडी; सुसाइड नोटमध्ये ४ शिक्षिका व मुख्याध्यापकांचे नाव
3
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
4
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
5
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
6
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
7
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
8
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
9
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
10
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
11
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
12
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
13
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद
14
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
15
"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
16
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
17
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
18
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
19
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
20
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
Daily Top 2Weekly Top 5

"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:49 IST

१० वर्षांपासून न झालेल्या स्थानिक निवडणुकांचा मुद्दा वकिलांनी मांडलाच नाही असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Prithviraj Chavan: शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावरील कायदेशीर लढाईतील निर्णय सुप्रीम कोर्टाने थेट जानेवारी २०२६ पर्यंत पुढे ढकलल्याने ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय धक्का बसला आहे. चिन्हाबाबत निर्णय न झाल्यामुळे ठाकरे गटाला मशाल (Mashaal) चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांना चिन्हाच्या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. एका मिनिटांमध्ये हा खटला संपला, निवडणुका झाल्या नाहीत हा मुद्दा मांडायला हवा होता, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने वारंवार केली होती. मात्र, न्यायालयाने सुनावणीची तारीख २०२६ पर्यंत निश्चित केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुकीच्या या महत्त्वाच्या टप्प्यात पक्षाचे मूळ धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर बाजूवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना चिन्हाबाबतचा निर्णय लांबणीवर पडणे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर टीमच्या युक्तिवादात त्रुटी राहिल्या यावर बोट ठेवले आहे.

"शिवसेनेचा जो खटला झाला त्यावेळी त्यांनी पुन्हा चुकीचा युक्तिवाद केला. शिवसेनेच्या वकिलाने चुकीचे मुद्दे मांडले. एका मिनिटामध्ये हा खटला संपला. त्यामुळे त्यांनी आम्ही जानेवरीमध्ये ऐकतो असं म्हटलं म्हणजे सगळ्या निवडणुका संपल्यानंतर.  आम्ही ज्या स्थानिक निवडणुका लढणार आहोत त्या दहा वर्षे झालेल्या नाहीत हा मुद्दा त्यांनी मांडायला हवा होता. ७३ आणि ७४ ची घटना दुरुस्ती भाजप सरकारने मोडून काढलेले आहे हे सांगायला हवं होतं. त्यामुळे या निवडणुका होण्यापूर्वी तुम्ही आम्हाला चिन्हाबाबत लवकर निर्णय द्या असंही म्हणायला हवं होतं. पण  ही बाजू मांडली गेलेली नाही," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला येत्या निवडणुकीत पुन्हा धनुष्यबाण नसतानाही भाजप-शिंदे-अजित पवार महायुतीशी दोन हात करावे लागणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray's lawyers failed to raise key points, claims Prithviraj Chavan.

Web Summary : Prithviraj Chavan criticized Thackeray's legal team for mishandling the Shiv Sena symbol case in court. He stated key arguments regarding delayed local elections and constitutional amendments were not presented, leading to an unfavorable outcome.
टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय