शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

“नरेंद्र मोदींचा वैयक्तिक पराभव, नेता म्हणून दुसरा पर्याय निवडतील की...”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 18:02 IST

Prithviraj Chavan Reaction Maharashtra Lok sabha Election 2024 Result: एनडीएतील काही घटक पक्षांना घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले जाऊ शकते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Prithviraj Chavan Reaction Maharashtra Lok sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचे कल हळूहळू स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे. देशात एनडीएला जनाधार मिळताना दिसत असून, इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यातही महाविकास आघाडीने कमबॅक केले असून, महायुतीचे उमेदवार अनेक ठिकाणी पराभूत होताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा आणि महायुतीवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांचा हा वैयक्तिक पराभव आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.

मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशातील जनतेने नरेंद्र मोदीच्या विरोधात कौल दिला आहे. गेल्या निवडणूकीमध्ये भाजपाला स्व-बळावर २७२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या मिळालेल्या नाहीत. हा नरेंद्र मोदींचा वैयक्तिक पराभव आहे. भाजपा सरकार स्थापन करणार असेल तर प्रश्न असा की, पक्ष आणि पक्षातील नेते पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा नेता म्हणून निवडतील की, दुसरा कोणत्या पर्यायाचा निवडतील कारण मोंदीना ७५ वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे याचा विचारही केला पाहिजे, असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले जाऊ शकते

इंडिया आघाडी आणि एनडीएला मिळत असलेल्या जागांमध्ये फार मोठा फरक दिसत नाही. एनडीएतील काही घटक पक्षांना घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले जाऊ शकते. जर ज्यांना निमत्रंण दिले तर त्यांनाबरोबर घेऊन एक मोठी आघाडी तयार होईल, असा प्रयत्न करण्यास हरकत नसावी. कारण, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हाच प्रयत्न करतील. ते आमच्या घटक पक्षांपैकी कोणाला तरी फोडण्याचा प्रयत्न करतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

दरम्यान, ताजी आकडेवारी पाहता, आम्ही जो महाविकास आघाडीचे ३२-३३ जागांचा अंदाज व्यक्त केला होता, तो अंदाज खरा ठरतो आहे. जागा वाटापमध्ये गोंधळ झाला नसता, तर एक-दोन जागी पराभव झाला नसता. महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष खूप चांगल्या प्रकारे समन्वय निर्माण झाले आहे. नेत्यांपासून तळगळापर्यंत सर्वांनी एकमेकांना सहकार्य केले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण