शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Congress Politics: राज्यातील काँग्रेस आमदारांची राहुल गांधी घेणार थेट भेट, मोठा निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:42 IST

Congress Politics: काँग्रेसच्या १८ आमदारांनी सोमवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

- कमलेश वानखेडे नागपूर : काँग्रेसच्या १८ आमदारांनी सोमवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राहुल गांधी हेच कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील आमदारांशी भेटीसाठी इच्छुक आहेत, लवकरच ते आमदारांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकूण घेणार असल्याचे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. हे ऐकून भेटीसाठी गेलेले आमदार काहीसे सुखावले.संसदीय कामकाजाची माहिती देण्यासाठी ५ व ६ एप्रिलला संसदेत आयोजित अभ्यासवर्गात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील काँग्रेसचे आमदार दिल्लीत दाखल झाले. यापैकी संग्राम थोपटे, विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, सुरेश वरपूरकर, राजेश राठोड, लहू कानडे, अमित झनक, कैलास गोरंट्याल, दयाराम वानखेजे, राजू पारवे, संजय जगताप यांच्यासह १८ आमदारांनी के.सी. वेणुगोपाल व खरगे यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांना मिळत असलेल्या एकूणच वागणुकीबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

महामंडळांचे वाटप कधी?बडे नेते मंत्रिपदात खूश आहेत. आमदारांकडे कुणाचेच लक्ष नाही. महामंडळांवर आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेची अडचण असेल, तर किमान काँग्रेसच्या कोट्यात येणारी महामंडळे जाहीर करावी, अशी मागणी आमदारांनी केली. निधीचे सम प्रमाणात वाटप करावे व विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकाली काढावा, अशी मागणी केली. 

पालकमंत्र्यांवर नाराजीकाही आमदारांनी पालकमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. काही जिल्ह्यांत जिल्हास्तरीय समित्याही नेमलेल्या नाहीत. विशेष कार्यकारी अधिकारी पदावर कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत.  

कमी मतांनी पडलेल्या जागांकडे लक्ष द्याविदर्भासह राज्यातील विधानसभेच्या काही जागा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पडल्या आहेत. त्या जागांकडे हायकमांडने वेळीच लक्ष दिले, नियोजन केले व मंत्री, तसेच संघटनेच्या माध्यमातून काम करवून घेतले, तर या जागा जिंकता येऊ शकता. त्यामुळे अशा जागांवर लक्ष केंद्रित करावे, अशी विनंतीही आमदारांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण