शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देशात अजूनही काही लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर निशाणा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 1, 2021 14:29 IST

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापणार

पुणे : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. कारण आधीपासून औरंगाबाद चे संभाजीनगर करण्याबाबत कायम आग्रही भूमिका असणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसने या नामांतरासाठी दर्शविलेला विरोध यावरून महाविकास आघाडीत या मुद्द्यावरून एकमत नसल्याचे समोर येत आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून भाजपाने देखील काँग्रेस व शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना शिवसेना, काँग्रेस यांच्यावर कडाडून टीका केली. पाटील म्हणाले, औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का असा संतप्त सवाल उपस्थित करत संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेसचा विरोध आहे का? हाही प्रश्न विचारला. आणि असेलच विरोध तर मग औरंगजेबाचं नाव तरी कशाला असायला हवे ते पहिल्यांदा हटवले गेले पाहिजे. 

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे ही तर बाळासाहेब ठाकरेंची भूमिका.. तुम्ही नामांतराच्या गोधड्या वाळवत आहात असे आम्हाला म्हणत होता. तर मग आता करा नामांतर. काँग्रेसचा विरोध आहे, अन् शिवसेनेला नामांतर पाहिजे आहे यात आम्हाला पडायचं नाही. मात्र औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर व्हावे ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम भूमिका घेतली होती. मात्र पाच- सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर व्हावे असे म्हटले तर माझ्यावर सामनात अग्रलेख छापला होता. 

औरंगाबाद शहराच्या नामांतरावर काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात..  

महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितंले. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे