काँग्रेस, राष्ट्रवादीची संघर्षयात्रा म्हणजे नौटंकी - रामदास कदम

By Admin | Updated: June 11, 2017 16:29 IST2017-06-11T16:29:11+5:302017-06-11T16:29:11+5:30

संघर्ष यात्रा काढून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष नौटंकी करीत असल्याचा आरोप शिवसेना नेते

Congress, NCP's struggle for war is gimmicky - Ramdas Kadam | काँग्रेस, राष्ट्रवादीची संघर्षयात्रा म्हणजे नौटंकी - रामदास कदम

काँग्रेस, राष्ट्रवादीची संघर्षयात्रा म्हणजे नौटंकी - रामदास कदम

 ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 11 - संघर्ष यात्रा काढून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष नौटंकी करीत असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला.  भाजपाची भूमिका  शेतकरी विरोधीच राहणार असेल तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असा इशाराही कदम यांनी दिला.

 लातूर दौऱ्यावर आल्यानंतर कदम पत्रकारांशी बोलत होते. सुप्रिया सुळे यांनी शिवसेना हा पक्ष गोंधळलेला  असल्याचे मत व्यक्त केले आहे. या बाबत विचारले असता, आधी शरद पवार यांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी.  ते केंद्रात मोदी बरोबर असतात. असे सांगत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढलेली संघर्ष यात्रा नौटंकी असल्याची टिकाही कदम यांनी केली.  कॉंग्रेस, राष्ट्रवादीने राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारल्यानेच आज राज्याची बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले. भाजपाने जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखी शेतकरी विरोधी भूमिका ठेवली तर आम्ही सत्ते बाहेर असू हा टेकू आम्ही कधी हि काढून घेऊ. असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Congress, NCP's struggle for war is gimmicky - Ramdas Kadam