ठाणे मनपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची हातमिळवणी
By Admin | Updated: January 21, 2017 16:53 IST2017-01-21T16:49:09+5:302017-01-21T16:53:13+5:30
मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात मात्र आघाडी करत हातमिळवणी केली आहे.

ठाणे मनपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची हातमिळवणी
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 21 - मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात मात्र आघाडी करत हातमिळवणी केली आहे. सत्ताधारी शिवसेना आणि जिकडे-तिकडे सध्या बोलबाला असलेल्या भाजपाला 'काँटे की टक्कर' देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आले आहेत.
काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यात आज आघाडीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता दोन्ही पक्षांची उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुढील निर्णय घेणार असून लवकरच यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आहे.
दरम्यान, ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी निश्चित झाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपा या दोस्तांमधील कुस्ती संपून युतीचा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी बातम्या