शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची ‘अर्धमैत्री’

By admin | Updated: February 15, 2017 00:43 IST

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाने इतर पक्षांमधील आजी व माजी नगरसेवकांसह ४० पेक्षा जास्त जणांना पक्षात देऊन राष्ट्रवादी

पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाने इतर पक्षांमधील आजी व माजी नगरसेवकांसह ४० पेक्षा जास्त जणांना पक्षात देऊन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉँग्रेससमोर आव्हान उभे केले होते. मात्र, त्याला रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसने ८६ ठिकाणी आघाडी करत ‘अर्धमैत्री’ केली. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढती होत आहेत. शिवसेनेला अद्याप न गवसलेला सूर आणि सैरभैर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांच्या समीकरणावर महापालिकेतील सत्तेचे गणित ठरणार आहे. महापालिकेत गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सत्तास्थापनेसाठी कॉँग्रेसबरोबर आघाडी केली तरी दोन्ही पक्षांतील मतभेद वारंवार उफाळून येत होते. यंदाच्या निवडणुकीतही उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस अगोदरपर्यंत दोन्ही पक्ष स्वबळाचाच नारा देत होते. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन काही जागांवर आघाडी केली. वादातील जागांवर मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. विविध पक्षांतील विद्यमान नगरसेवकांना प्रवेश दिला. मात्र, उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलले गेल्याचा आरोप झाला. त्यामुळे नव्या- जुन्यांचा मेळ घालण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीचीही आघाडी झाली असली तरी मते एकमेकांकडे वळतील का हा प्रश्न आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवतीत यश मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला होता. त्याचबरोबर पक्षांतरांमुळे ताकद वाढली होती. भाजपाने रिपाइंला १० जागा सोडून त्यांच्यासोबत युती केली होती, मात्र रिपाइंच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी परस्पर कमळ चिन्ह घेतल्याने वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून कमळ चिन्ह घेतलेल्या दहाही उमेदवारांना निलंबित करून पुण्यातील युती तोडण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. रिपाइंने अचानक साथ सोडल्यामुळे त्यांची समजूत घालता येईल का? हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, गेल्या २५ वर्षांत प्रथमच भाजपा आणि शिवसेना वेगवेगळी लढत आहे. शिवसेनेला अद्याप सूर सापडलेला नाही. मात्र, काही प्रभागांमध्ये लक्षणीय मते घेण्याची शिवसेनेची क्षमता आहे. मनसे अद्याप पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरल्याचे वाटतच नाही. अद्याप या पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध झालेला नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकही सभा झालेली नाही. गेल्या वेळी मनसेने तब्बल २९ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळविला होता. मनसेच्या मतांमध्ये घट झाली तर ती कोणाकडे जाणार हा प्रश्न आहे. पुणे महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक ४८ जागा जिंकत काँग्रेसकडून पालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर पाच वर्षांनी २०१२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये आणखी ७ जागांनी वाढ करीत ५५ जागा मिळवून पुन्हा राष्ट्रवादी सत्तेवर आली. राष्ट्रवादीने पालिकेवर सलग १० वर्षे सत्ता केली आहे. या दहा वर्षात केलेली विकासकामे पुढे करून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. एकेकाळी पुण्याचा कारभारी असलेल्या काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था मात्र बिकट झाली आहे. सध्या या पक्षाचे २८ नगरसेवक आहेत. शिवसेनेला मुंबईच्या नेतृत्वाकडून त्यांना पुरेशा प्रमाणात रसद मिळत नसल्याची नाराजी त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. मतदानाला आता अवघे ७ दिवस शिल्लक राहिले असल्याने सर्वच पक्षांच्या प्रचाराला जोर आला आहे.-विजय बाविस्कर