शहरं
Join us  
Trending Stories
1
विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम आहात का? रवींद्र चव्हाणांनी दिलं असं उत्तर, म्हणाले...
2
चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी, MCX वर २.४९ लाखांच्या पार, गुंतवणूक करावी की नफा वसूल करावा?
3
"दोन्ही हात वर करून सांगतो..."; रितेश देशमुख यांचे भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना एका वाक्यात उत्तर
4
न मिसाईल, न रॉकेट! फक्त एका 'गुप्त' ड्रोनने केला मादुरो यांचा गेम; लादेनला शोधणारा 'शिकारी' पुन्हा चर्चेत
5
सिंपल वनने २०२१ मध्ये वात पेटविली, २०२६ मध्ये धमाका केला! ४०० किमी रेंजची स्कूटर लाँच...
6
शिखर धवन दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, गर्लफ्रेंड सोफी शाईनसोबत 'या' दिवशी होणार विवाहबद्ध
7
मंथ एनिव्हर्सरी साजरी न केल्याने नाराज, थेट आयुष्य संपवलं; एक महिन्यापूर्वीच केलेलं लव्ह मॅरेज
8
मुंबई, पुण्यासारखी शहरे असूनही...! सोने खरेदीत महाराष्ट्र कितव्या नंबरवर? खरेदीचा पॅटर्न बदलला...
9
"कितीही कुहू-कुहू केलं तरी, साहेब शिवडी तुमचीच राहणार"; नांदगावकरांचे लालबागमध्ये जोरदार भाषण
10
Nikitha Godishala Murder: "तो बॉयफ्रेंड नाही तर रूममेट..."; अमेरिकेत हत्या झालेल्या निकिताच्या वडिलांचा खळबळजनक दावा
11
कोणाचे ३ लाख तर कोणाचे ३.५० लाख बुडवले; शशांकनंतर मराठी कलाकारांकडून मंदार देवस्थळींची पोलखोल
12
धक्कादायक! लग्नाचं वचन देऊन डॉक्टरनं फिरवली पाठ; महिला डॉक्टरने टोचलं विषारी इंजेक्शन
13
Petrol-Diesel Price: यावर्षी कमी होणार का पेट्रोल-डिझेलची किंमत? ५० डॉलर्सपर्यंत येऊ शकतात कच्च्या तेलाचे दर
14
समृद्धीवर धावत्या खासगी लक्झरी बसला आग; ५२ प्रवासी थोडक्यात बचावले
15
देव करो पैसे न देणारी जमात नष्ट होवो...! शशांक केतकरला पाठिंबा देत प्रसिद्ध अभिनेत्रीची कमेंट
16
बांगलादेशात विकृती...! हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार; झाडाला बांधून मारहाण, केस कापले...
17
वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रेन वॉश अन् १५ वर्षीय मुलगा बनला गुप्तहेर; लष्करी तळांचे व्हिडिओ पाकिस्तानात पाठवले
18
६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने पहाटेच दिला दणका; लष्कराची विमानं आकाशात, नागरिकांची उडाली धांदल
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियंत्रणाखाली व्हेनेझुएलाचं कच्चं तेल; वारंवार देताहेत भारताला धमकी आहे, एकंदरीत गणित बदलेल का?
20
निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीची ठाण्यात आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 00:24 IST

शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी ठाण्यात अजून सुरूच झाल्या नसताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याची माहिती काँग्रेस नेते आ. नारायण राणे यांनी दिली.

ठाणे : शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी ठाण्यात अजून सुरूच झाल्या नसताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याची माहिती काँग्रेस नेते आ. नारायण राणे यांनी दिली. दोन्ही पक्षांचे जागावाटप उभय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांच्या अनुमतीने जाहीर केले जाणार आहे.राणे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदेही हजर होते. जागा वाटपावर सखोल चर्चा केल्यावर आघाडीचा निर्णय घेण्यात आल्याचे राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले की, आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे १०० टक्के एकमत झाले आहे. सध्या काँग्रेसचे सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २१ नगरसेवक असून त्या प्रमाणात दोन्ही पक्षांचे जागा वाटप केले जाईल. कुठली जागा कुणी लढवायची, याबाबत वाद नाहीत. कुणी कोणत्या जागा लढवायच्या, याची यादी तयार आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनंतर यादी लवकरच जाहीर केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा ६०-४० जागांचा फॉर्म्युला आहे, तर काँग्रेसचा आग्रह ५५-४५ जागांसाठी आहे. कळवा-मुंब्रा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून तेथील जागांवरून आघाडीच्या वाटाघाटींमध्ये गतिरोध निर्माण झाला होता. राणे यांच्या मध्यस्थीनंतर तो निवळला. (विशेष प्रतिनिधी)