शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

काँग्रेस-राष्ट्रवादी ही दिवाळखोरीत निघालेली बँक - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 17, 2017 16:21 IST

आयुष्यभर जमा केलेली पुंजी सुरक्षीत ठेवण्यासाठी आपण चांगली बँक निवडतो. चांगला परतावा देणारी, सुरक्षीत बँक आपल्याला हवी असते. असाच प्रकार हा मतदानाचा आहे.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 17 -  आयुष्यभर जमा केलेली पुंजी सुरक्षीत ठेवण्यासाठी आपण चांगली बँक निवडतो. चांगला परतावा देणारी, सुरक्षीत बँक आपल्याला हवी असते. असाच प्रकार हा मतदानाचा आहे. ज्या मतामुळे तुमच्या शहराचा विकास होईल, तुम्ही व्यक्त केलेल्या अपेक्षांची पुर्ती होईल, अशाच बँकेत आपल्या मतांचे ‘डिपॉझिट’ आपण केले पाहिजे. सध्याच्या निवडणुकीत मतांचे ‘डिपॉझिट’ मागण्यासाठी आलेल्या पक्षांमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर राहुल गांधी यांचा काँग्रेस या दोन्ही बँका कितीही चकचकीत दिसत असल्या तरी त्या दिवाळखोरीत निघालेल्या आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.
अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महापौर उज्ज्वला देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. 
मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार व राहुल गांधी यांचे पक्ष दिवाळखोरीत निघाल्याचे सांगतानाच भाजपा हा एक सक्षम पर्याय असल्याचे स्पष्ट केले. या बँका परतावा तर देत नाहीच; मात्र मुद्दलही फस्त करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. मतदान रुपी डिपॉझिट भाजपला दिले तर पाच वर्षांत पाच पट विकासाचे व्याज देऊन मुद्दलही परत करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजपा सरकारने दमदार कामगिरी करीत शहराच्या विकासाचा आलेख उंचावला असल्याचे ते म्हणाले.
 
आता पाय मोकळा करून घेतला...
शिवसेनेसोबत युती तुटल्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी सूचक भाष्य केले. शिवसेनेचा उल्लेख टाळत मुख्यमंत्री म्हणाले, की भाजपा स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण लोकांमध्ये जात आहोत. त्यामुळे या निवडणुकी स्वबळावर सत्ता मिळेल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. आता पाय मोकळा करून घेतला आहे. तो पुन्हा अडकविण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही मला मनपा द्या, मी तुम्हाला विकास, परिवर्तनाचा शब्द देतो, असे आवाहन त्यांनी केले.
 
विदर्भातील मनपांना जादा निधी...
विदर्भातील महापालिकांपैकी नागपूरमध्ये विकासाची घोडदौड सुरु आहे. परंतु, अकोला, अमरावती व चंद्रपूर या महापालिकांना अजुनही विकासाची आस आहे. या विदर्भाचा भूमीपूत्र आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आतापर्यंत राज्याच्या एकाच भागाला निधी जात होता. आता तो अन्याय दूर करीत आहोत. राज्याच्या सर्वच भागांचा विकास झाला पाहिजे, यासाठी आपण कटीबद्ध आहोतच; परंतु आतापर्यंत ज्या भागाला विकास निधी देताना हात आखडता घेतल्या गेला, तेथे विकासाचा अधिक निधी जात असेल, तर कोणाच्या पोटात दुखता कामा नये, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.