काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक पवित्र्यात

By Admin | Updated: December 10, 2014 01:39 IST2014-12-10T01:39:41+5:302014-12-10T01:39:41+5:30

कामकाज थांबवून प्रथम शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्या, अशी आग्रही भूमिका घेत मंगळवारी विरोधी पक्षांनी विधानपरिषदेत गोंधळ घातला.

Congress-Nationalist in aggressive holiness | काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक पवित्र्यात

काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक पवित्र्यात

नागपूर : कामकाज थांबवून प्रथम शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्या, अशी आग्रही भूमिका घेत मंगळवारी विरोधी पक्षांनी विधानपरिषदेत गोंधळ घातला.  विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रितपणो सभागृहात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे कामकाज सुरुवातीला सहावेळा व अखेर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
सकाळी 11 वा. पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यासह इतरही सदस्यांनी सभागृहाचे सर्व कामकाज थांबवून शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, मात्र सरकारला त्यांच्या समस्यांशी काहीही देणोघेणो नाही, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यामुळे कामकाज 2क् मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
 
ठाकरे, मुंडे यांचा पुढाकार
च्सकाळपासून सुरू झालेल्या गोंधळात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकवटलेले दिसून आले. सरकारविरोधात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे अधिक आक्रमक झाले होते. जोर्पयत शेतक:यांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही तोर्पयत कामकाज चालू देणार नाही, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

 

Web Title: Congress-Nationalist in aggressive holiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.