शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “...तर तुमचं नेतृत्व कमी पडत होतं, पक्ष कमजोर होता का?”; पटोलेंचा राऊतांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:35 IST

Maharashtra News: संजय राऊतांनी हे प्रश्न काढल्याने महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न निकाली निघणार नाही. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, असा सल्ला नाना पटोलेंनी दिला.

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून  अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून टीका करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या गोष्टीचे समर्थन केले. यानंतर आता नाना पटोले यांनी यावरून संजय राऊतांवर पलटवार केला आहे. 

मी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळले नसते असे म्हणता तर तुमचे नेतृत्व कमी पडत होते, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अशी विचारणा करत, मला शक्तीशाली समजत असल्याबद्दल संजय राऊतांचे आभार मानतो. मी राहिलो असतो तर खोक्याचे सरकार आले नसते. मी राहिलो असतो तर महाविकास आघाडीचे सरकार राहिले असते. अशा पद्धतीचे वक्तव्य करून ते माझ्या शक्तीचा परिचय करून देत आहे. त्यांनी माझ्या शक्तीचा देशाला परिचय करून दिला आहे. पण ज्या पक्षाचे जे कोणी खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा पक्ष कमजोर होता का? त्या पक्षाचे नेतृत्व कमी पडत होते का? असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का? हा प्रश्न निर्माण होतो, असा टोला नाना पटोलेंनी लगावला. 

पक्षाचा आदेश पाळणे हे कार्यकर्ता म्हणून माझे काम होते

मला संवैधानिक अधिकार होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केले नाही केले, त्यावर ते बोलत नाहीत. राऊत यांनी हे प्रश्न काढल्याने महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न निकाली निघणार नाही. राऊतांनी या प्रश्नात लक्ष घालावे. भाजपने खोक्याने सरकार पाडले, अशी टीका करत, मला विधानसभा अध्यक्ष पद देण्याचा निर्णय हा सोनिया गांधी यांचा होता. मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णयही सोनिया गांधी यांचाच होता. पक्षाचा आदेश पाळणे हे कार्यकर्ता म्हणून माझं काम होते. हायकमांडच्या निर्णयावर कोणी प्रश्न उपस्थित करत असेल तर ते योग्य नाही. मी फक्त राऊतांना सल्ला देऊ शकतो. मी काही विद्वान नाही, असा टोलाही नाना पटोलेंनी लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊत