शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

“भाजपा युतीकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात, सरसकट २१०० रुपये द्यावे”; काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:46 IST

Congress Nana Patole News: भाजपा महायुती सरकारने आश्वासनांची पूर्तता करत सरसकट सर्व बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Congress Nana Patole News: विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) मदत घेतली जाणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तसेच कुटुंबात चारचाकी गाडी असेल तर अशा महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याआधारे आम्ही काही पावले उचलत आहोत. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार होणार आहे. यावरून आता विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेवरून भाजपा महायुती सरकारवर निशाणा साधला. विधानभा निवडणुकीत माता भगिनींची मते घेण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु करून सरसकट सर्व भगिनींना दीड हजार रुपये दिले आता या सरकार स्थापन झाल्याने भाजपाला बहिणींची गरज राहिलेली नाही म्हणूनच बहिणींना धमक्या देऊन पैसे परत घेण्याची भाषा केली जात आहे हा विश्वासघात आहे. भाजपा महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत सरसकट सर्व बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू

संजय राऊतांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत हा आमचा विषय कधी राहिला नाही आणि राहणार  नाही. मूळ प्रश्न देशातील शेतकरी अडचणीत आला आहे, हा आहे. देशाला कसे सुरक्षित करता येईल, यावर आमचा भर आहे. महागाईमुळे जनता परेशान झाली आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. काँग्रेससमोर देश सर्वप्रथम आहे आणि मग हे छुटूक मुटूक राजकारण. यांचा आम्ही नंतर विचार करू, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला. 

दरम्यान, राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा महायुती सरकार पुरस्कृत असल्याचा मोठा आरोप करत, सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा महायुती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस