शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Maharashtra Politics: “राज्यपाल कसे नसावेत याचे भगतसिंह कोश्यारी उत्तम उदाहरण, भाजपला पापाची फळे भोगावी लागतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 16:30 IST

Maharashtra News: भगतसिंह कोश्यारींसारखे राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून  केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजप कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली आहेत त्याची फळे भाजपला भोगावीच लागतील अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अवमान करणे हाच भाजपचा अजेंडा आहे. त्यासाठीच त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदी बसवले होते. राज्यपाल पदावर नियुक्ती झाल्यापासून कोश्यारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून त्यांनी राज्यपालपदाची गरिमा घालवली, अशी टीका नाना पटोलेंनी केली. 

कोश्यारींसारखे राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते

विधानरिषदेच्या आमदारांची नियुक्ती, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा विविधप्रसंगी ते निष्पक्षपणे न वागता भाजपचे एजंट असल्याप्रमाणे वागले. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आणि शिंदे भाजपचे सरकार स्थापनावेळी त्यांनी नियम कायदे पायदळी तुडवून दाखवलेली विशेष सक्रियता राज्यपाल कसे असू नयेत याचे उदाहरण आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या इशा-यावर रोबोटप्रमाणे काम करणारे कोश्यारींसारखे राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, या शब्दांत नाना पटोलेंनी हल्लाबोल केला. 

भगतसिंह कोश्यारी हे राज्यपास कसे असू नयेत याचे उत्तम उदाहरण

भगतसिंह कोश्यारी हे राज्यपास कसे असू नयेत याचे उत्तम उदाहरण आहेत. राजभवनात बसून त्यांनी केलेले राजकारण राज्यातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. केंद्र शासनाने त्यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करत त्यांना सन्मानाने निवृत्ती दिली. कोश्यारींनी अनेकवेळा घटनेची पायमल्ली केलेली आहे. केंद्राने त्यांची हकालपट्टी करून चौकशी लावली असती तर केंद्र सरकारची घटनेप्रतिची निष्ठी दिसली असती. पण केंद्र  सरकारने कोश्यारींच्या पापावर पांघरून घालून त्यांना माफ केले असले तरी राज्यातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, नवे राज्यपाल रमेश बैस यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या पावलावर पावले न टाकता, निष्पक्षपणे कार्य करावे आणि कोश्यारींनी घालवलेली राज्यपाल पदाची गरिमा पुर्नस्थापित करावी अशी अपेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी