शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

“साखर कारखान्यांना १०० कोटींचे व्याज माफ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस पैसे नाहीत!”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:55 IST

Congress Nana Patole News: मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मर्यादेत राहून बोलावे, असे सांगत नाना पटोले यांनी आम आदमी पक्षावर टीका केली.

Congress Nana Patole News: लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्य़क्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम सुरु आहे. ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला पण या अधिकारावरच भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने दरोडा टाकत आहे. नुकत्याच पार पडललेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सर्व पातळ्यांवर घोटाळे करण्यात आले. मतदार याद्या, मतदान व मतमोजणीत घोळ करून भाजपा सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मदतच केली आहे. काँग्रसने या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला असून निवडणूक आयोगाकडे मतदारयाद्या व वाढलेल्या मतदानाची सर्व माहिती मागितली पण निवडणूक आयोग माहितीच देत नाही. निवडणूक आयोगने आता सर्व डेटा डिलीट करून टाकला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर व लोकशाहीसाठी घातक आहे असे पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

एसटी, रिक्षा व टॅक्शीची भाडेवाढ करून जनतेला महागाईच्या संकटात लोटत आहे

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे, नोकर भरती करण्याचे आश्वासन देऊन भाजपा महायुती सरकार सत्तेत आले आहे पण आता हे सरकार कर्जमाफी देण्यासाठी, नोकर भरतीसाठी निधी नाही असे सांगत आहे पण दुसऱ्याकडे सरकार बगलबच्च्यांवर सवलतींची खैरात करत साखर कारखाण्यांचे १०० कोटी रुपयांचे व्याज माफ करते हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. महागाई कमी करण्याऐवजी एसटी, रिक्षा व टॅक्शीची भाडेवाढ करून जनतेला महागाईच्या संकटात लोटत आहे, असेही पटोले म्हणाले.

दरम्यान, ‘आप’ने दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बदनामी करणारी पोस्टर्स लावल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मर्यादेत राहून बोलावे. बेईमान कोण? व भाजपाची बी टीम कोण? हे देशातील जनतेला माहिती आहे, असे खडेबोल नाना पटोले यांनी सुनावले. 

 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोले