शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 15:22 IST

Maharashtra Assembly Election 2024: मविआतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत. भाजपात महिलांना मंत्रि‍पदेही दिली जात नाही, अशी टीका काँग्रेस खासदाराने केली.

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक दावे-प्रतिदावे केले जात असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून राज्यात अनेक चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही लागत आहेत. यातच आता राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नावे आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या महिला खासदाराने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. 

अद्यापपर्यंत महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महिला मुख्यमंत्री हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात निवडणूक होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. यातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महिला मुख्यमंत्री विषयावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

मुख्यमंत्री महिला झाली तर फारच आनंद होईल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का? अशा आशयाच्या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांनी थेट भाष्य केले. महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे सुप्रिया सुळे आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडे रश्मी ठाकरे आहेत. आमच्या पक्षाकडेही महिला नेत्या आहेत. त्याबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतात, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींना आम्ही संघर्ष करताना पाहिले आहे. भाजपाकडे बघा, भाजपमध्ये महिलांना मंत्रिपदही दिले  जात नाही. पक्षाचे अध्यक्षपद दिले जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण ५० टक्के आरक्षणही लागू केले असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Varsha Gaikwadवर्षा गायकवाडSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी