शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

संजय राऊत बोलण्याला लगाम घालतील; सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावर काँग्रेस नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 20:26 IST

सावरकरांबद्दलच्या विधानाबद्दल काँग्रेसकडून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त

सोलापूर: सावरकरांवरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच केलं होतं. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेनेबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. संजय राऊत अंदमानला जाऊन आलेत की नाही, याबद्दल मला माहीत नाही. पण ते बोलण्याला लगाम घालतील असं मी समजतो, असं दलवाई सोलापूरमध्ये म्हणाले. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातल्या काँग्रेस सेवादलानं एक पुस्तिका प्रसिद्ध केली होती. त्यात सावरकरांबद्दल करण्यात आलेल्या लेखनानं वाद निर्माण झाला होता. मात्र काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकरांच्या कार्याचं कौतुक केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही, असं दलवाई म्हणाले. सावरकरांनी माफीचं पत्र लिहिलं असं काही जण म्हणतात. मात्र मला या प्रकरणात कोणताही वाद निर्माण करायचा नाही, अशा शब्दांत दलवाईंनी त्यांची भूमिका मांडली.मुस्लिमांना राज्यातल्या सत्तेत वाटा मिळायला हवा, असं दलवाई म्हणाले. मुस्लिमांना सत्तेत सामावून घ्यायला हवं. महाराष्ट्रातला मुसलमान हा खऱ्या अर्थानं इथल्या मातीतला मुसलमान आहे. तो कधीच हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याची भाषा करत नाही. कोणी तरी हैदराबादवरुन शेरवानी घालून येतो आणि इथं गडबड करतो हे आम्हाला मान्य नाही. हे कुठेतरी थांबवायला हवं, अशा शब्दांत त्यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर नाव न घेता टीका केली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHussein Dalwaiहुसेन दलवाईVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना