शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांचा शेतकरी आंदोलनात सहभाग

By admin | Updated: June 5, 2017 13:56 IST

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राहटगाव येथे शेतक-यांच्या आंदोलना पाठिंबा देत त्यात सहभागही नोंदवला.

ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 5 - काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राहटगाव येथे शेतक-यांच्या आंदोलना पाठिंबा देत त्यात सहभागही नोंदवला. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूकही रोखून धरली.
 
आंदोलनकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर जाळपोळदेखील केली. यशोमती ठाकूर यांनी शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली.  
 
जाळपोळ आणि तीव्र आंदोलनामुळे काही काळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता. 
 
 
 
 
 
 
कर्जमाफीसहीत विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.  यवतमाळ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाननंही कडकडीत बंद पाळला आहे. शेतक-यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास शासनाकडून होत असेलल्या दिरंगाईला विरोध दर्शवण्यासाठी शेतक-यांनी बसस्थानक चौकात मुंडण करून शासनाचा निषेध केला. 
 
 
तसंच यवतमाळ-घाटंजी मार्गावरील कोळंब फाटा आणि नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील भांबराजा येथे  चक्काजाम आंदोलन करण्यात आल्यानं येथील वाहतूक ठप्प झाली होती.
(शेतकरी संप : नाशिकमध्ये फडणवीस सरकारची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा)
तर नाशिकमधील वडांगळी येथे आंदोलकर्त्या शेतक-यांनी फडणवीस सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  तर चांदवड येथे संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतक-यांचा ""महाराष्ट्र बंद"" उर्त्स्फुत  प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे.
 
लासलगाव-चांदवड रस्त्यावर शिवसेनेच्या वतीनं रास्तारोको करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्या सह 5 ते 6  शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लासलगाव, चांदवड, ठेंगोडा येथील व्यापाऱ्यांनीही  दुकाने 100 टक्के बंद ठेऊन संपला पाठिंबा दर्शवला आहे. तर नांदूर शिंगोटे, भोजापूर खोरे, दोडी, दापूर, मानोरी इत्यादी भागांत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.                        
(VIDEO : जळगावात काढली मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा)
शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांची  पूर्तता करण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून संपात सहभागी झालेल्या जळगावातील उंबरखेडमधील शेतक-यांनी सोमवारी (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.