माणिकराव ठाकरेंमुळे काँग्रेस सोडली

By Admin | Updated: January 25, 2017 03:02 IST2017-01-25T03:02:27+5:302017-01-25T03:02:27+5:30

विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना आपली पक्षात अडचण होत होती, ती दूर करण्यासाठी आपण काँग्रेस सोडत

Congress left for Manikrao Thackeray | माणिकराव ठाकरेंमुळे काँग्रेस सोडली

माणिकराव ठाकरेंमुळे काँग्रेस सोडली

दिग्रस (यवतमाळ) : विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना आपली पक्षात अडचण होत होती, ती दूर करण्यासाठी आपण काँग्रेस सोडत आहोत, असा आरोप करत, माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आपल्या भाजपा प्रवेशाचा २८ फेब्रुवारीला मुहूर्त जाहीर केला.
गेल्या काही दिवसांपासून संजय देशमुख काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. त्यावर मंगळवारी येथे झालेल्या पत्रपरिषदेत देशमुख यांनी स्वत:च मोहर उमटविली. २८ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात पक्षप्रवेश होत आहे.

Web Title: Congress left for Manikrao Thackeray