शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

“भाजपनंच उडवलेला चिखल साफ धुण्याचं तंत्रज्ञान असलेलं वॉशिंग मशीन त्यांच्याकडेच, हे आज स्पष्ट झालं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:22 IST

अडीच वर्षांनंतर राज्यपालांना अशा प्रफुल्ल मनस्थितीत आम्ही पाहत आहोत, मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस नेत्याचा टीकेचा बाण.

राज्य मंत्रिमंडळाचा गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक दिवसांपासून रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली.

“आज राज्यपालांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. अडीच वर्षांनंतर त्यांना अशा प्रफुल्ल मनस्थितीत आम्ही पाहत आहोत. भाजपनेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपकडेच आहे, हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारातही स्पष्ट झाले. विजयकुमार गावित, संजय राठोड यांच्यावर भाजपानेच आरोप केले होते,” असं म्हणत सचिन सावंत यांनी शिंदे भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

७२ तासांत मंत्री होणाऱ्यांना आता मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता तरी कुडमुड्या ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत दादा पाटील विज्ञानवादी दृष्टीने व अब्दुल सत्तार हिंदूत्वाच्या उद्धारासाठी समर्पित होऊन काम करतील ही अपेक्षा व शुभेच्छा, असंही ते म्हणाले.अजित पवारांकडूनही टीकाउशिरा का होईना महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. आता राज्याचे प्रश्न सोडवावे. ज्यांच्याबद्दल काही बोललं जातं, क्लिनचीट मिळाली नाही. त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जातं, ते टाळलं असतं तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMaharashtraमहाराष्ट्र