शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 07:20 IST

Nana Patole on election commission of india: निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या ४५ दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: आमच्या व्हिडीओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरविली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने आयोगाने आपल्या नियमात बदल केले. निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या ४५ दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, या कालावधीत निवडणूक निकालाला कोणी न्यायालयात आव्हान दिले तर हे फुटेज अधिकाऱ्यांना नष्ट करता येणार नसल्याचे संबंधित निर्देश देताना आयोगाने स्पष्ट केले.

३० मे रोजी निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे संबंधित निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान केलेले छायाचित्रण, व्हिडीओग्राफी, सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग आदी  अनेक रेकॉर्डिंग उपकरणांद्वारे निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांचे रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, निवडणूक कायद्याद्वारे अशी रेकॉर्डिंग करणे बंधनकारक नाही. निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये अंतर्गत व्यवस्थापनाचे साधन म्हणून आयोगाकडून अशा प्रकारच्या रेकॉर्डिंगचा वापर केला जात होता. मात्र, या माहितीच्या आधारे सोशल मीडियावर गैरसमज व चुकीची माहिती पसरविली गेल्याचे आढळले आहे. अशा प्रकारच्या माहितीचा वापर निवडकपणे व कोणताही संदर्भ नसताना करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

चोरी पकडली जाण्याच्या भीतीने नियम बदललाचंदिगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता, पण आपली चोरी पकडली जाणार या भितीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या ४८ तासात नियम ९३ बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग