शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवलाय, भाई जगताप यांचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:37 IST

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे असं मत व्यक्त केलं.

दरम्यान, या सर्वांत आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा महत्त्वाची आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. “कोणत्याही कुटुंबाला त्रास होऊ नये हे सर्वांचं कर्तव्य आहे. शिवसैनिक हा रिअॅक्टिव्ह आहे. आतापर्यंत शिवसेनेशी गद्दारी केलेल्या लोकांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे. ही वस्तुस्थिती. काय घडावं तो ज्याच्या त्याचा प्रश्न. पण कुटुंबीयांपर्यंत हे जाता कामा नये. कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल,” असं भाई जगताप म्हणाले.

“महाविकास आघाडी होण्याचं कारण काँग्रेसच होतं. काँग्रेसनं सर्व गोष्टींचा विचार करून, महाराष्ट्राची परवड, मुंबईची पिछेहाट, फडणवीसांनी जे महाराष्ट्राचं वाटोळं केलं, त्याला छेद देण्यासाठी काँग्रेसनं भूमिका मांडली. आम्हाला सत्तेची हाव नाही. जे महाराष्ट्राचं वाटोळं करतायत त्यांना थांबवायला हवं ही भूमिका आजही आहे आणि पुढेही राहिल. आमचे ४४ आमदार ठाम आहेत आणि आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम आहोत,” असंही ते म्हणाले. जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरुन सरकार अस्थिर झाल्याचं दिसत आहे. परंतु असं अनेकदा झालंय. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना असा प्रकार झाला होता. त्यावर मात केली गेल्याचंही असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची इभ्रत घालून सरकार चालवू नका ही सर्वांनाच विनंती असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेनाbhai jagtapअशोक जगतापEknath Shindeएकनाथ शिंदे