एग्झिट पोलच्या भाकितापेक्षा काँग्रेसला जास्त जागा

By Admin | Updated: May 13, 2014 19:50 IST2014-05-13T19:50:22+5:302014-05-13T19:50:22+5:30

लोकसभा निवडणुकांसंबंधी एग्झिट पोलने वर्तविलेल्या भाकितापेक्षा काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळणार आहे.

Congress has more seats than exit polls | एग्झिट पोलच्या भाकितापेक्षा काँग्रेसला जास्त जागा

एग्झिट पोलच्या भाकितापेक्षा काँग्रेसला जास्त जागा

>ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, दि. १३ - लोकसभा निवडणुकांसंबंधी एग्झिट पोलने वर्तविलेल्या भाकितापेक्षा काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळणार आहे. तसेच हे सर्व भाकिते खोटे ठरणार असल्याचा विश्वास केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केला. 
अनेक एग्झिट पोलने भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज साफ चुकीचा ठरणार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. भाजपाने नरेंद्र मोदी यांची लाट आहे असे दाखविण्यासाठी पुष्कळ पैसा खर्च केला. भाजपाच्या तुलनेत काँग्रेसने खूप कमी पैसा खर्च केला. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक वृत्तवाहिन्यांचे एग्झिट पोल हे चुकीचे ठरले होते त्याची पुनरावृत्ती यावर्षी होणार असल्याचे जयराम रमेश म्हणाले. 

Web Title: Congress has more seats than exit polls