काँग्रेसची अवस्था फार वाईट झाली आहे़ - हंसराज अहिर
By Admin | Updated: June 27, 2016 16:47 IST2016-06-27T16:45:46+5:302016-06-27T16:47:59+5:30
काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी आपला भाजप पक्ष मजबूत करा़ केंद्र आणि राज्याने घेतलेले विविध निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले़

काँग्रेसची अवस्था फार वाईट झाली आहे़ - हंसराज अहिर
>भाजपा कार्यकारिणीची बैठक : काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी भाजप पक्ष मजबूत करा़
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २७ - काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी आपला भाजप पक्ष मजबूत करा़ केंद्र आणि राज्याने घेतलेले विविध निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले़
भाजप शहर कार्यकारिणीची बैठक लिंगशेट्टी मंगल कार्यालयात आयोजित केली़ सायंकाळच्या सत्रामध्ये अहिर यांच्या उपस्थितीत या बैठकीचा समारोप करण्यात आला़ यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ़ सुभाष देशमुख, प्रा़ अशोक निंबर्गी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़
अहिर म्हणाले की काँग्रेसची अवस्था फार वाईट झाली आहे़ आता आपल्याला काँग्रेसमुक्त भारत करावयाचा आहे़ येत्या काही काळात नगरपालिका, पंचायत समिती आणि जि़प़ आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आपले लक्ष त्या निवडणुका जिंकण्यावर असले पाहिजे़. भाजपमध्ये बुथ रचनेला खूप महत्त्व आहे त्यामुळे आतापासून मेहनत घ्या निश्चित यश मिळेल, असेही ते म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून काम करावे आणि पक्षाचा मूळ हेतू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला तर आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आ़. सुभाष देशमुख यांनी सहकार आणि उद्योग याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ विविध योजनांचा लाभ घेऊन कार्यकर्त्यांनी सहकारी तसेच उद्योग क्षेत्रात देखील प्रवेश करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला़.