बंडखोरांवर कॉँग्रेसचा कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 01:33 IST2017-04-06T01:33:59+5:302017-04-06T01:33:59+5:30
नाशिक : शिवसेनेसोबत आघाडी करणाऱ्या कॉँग्रेसचे आठपैकी तीन जिल्हा परिषद सदस्य फुटल्याने कॉँग्रेसच्या उमेदवार अश्विनी अहेर यांचा पराभव झाला

बंडखोरांवर कॉँग्रेसचा कारवाईचा इशारा
रावेत : शहरातील भक्ती-शक्ती चौक, प्राधिकारणामधील संभाजी चौक, सेक्टर २८ ते बिजलीनगर पुलाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा झाडांच्या फांद्या धोकादायक पद्धतीने रस्त्यावर झुकलेल्या आहेत. सदरचा रस्ता हा वर्दळीचा आहे, भक्ती-शक्ती चौक ते थेरगाव, चिंचवडकडे जाण्यासाठी व येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते.
वाढलेल्या फांद्या रस्त्यावर झुकल्यामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकी चालकांना या फांद्याचा धोका अधिक प्रमाणात आहे, त्याकरिता उद्यान विभागाने त्वरित ठिकठिकाणी वाढलेल्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिक करीत आहेत. याच मार्गावरून म्हाळसाकांत, गुरुगणेश, सरस्वती, सीएमएस, सिटी प्राइड कॅम्प एज्युकेशन, ज्ञान प्रबोधिनी, क्रीडा प्रबोधिनी आदी शाळांमधील विद्यार्थी या मार्गावरून ये- जा करीत असतात. त्यामुळे वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटने आवश्यक आहे़ शहरातील झाडांसाठी पावसाळ्याचे दिवस सर्वाधिक धोकादायक असतात. कारण याकाळात शहरातील अनेक भागातील झाडे उन्मळून पडतात. झाडांच्या अनावश्यक फांद्यांची छाटणी करून ही संभाव्य आपत्ती टाळता येऊ शकते. त्यामुळे झाडांची चांगली वाढ होईल. शहरातील मुख्य रस्त्यांवरील दिव्यांवर झाडांच्या फांद्या येऊन झाडाखाली अंधार येत असतो. छाटणीमुळे दिव्यांचा प्रकाशही नीटपणे रस्त्यावर पडतो. मात्र, या वृक्षछाटणीबाबत गेली अनेक वर्षे वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त होते. (वार्ताहर)