युती तुटल्याने काँग्रेसचा विजय सुकर - अशोक चव्हाण

By Admin | Updated: January 27, 2017 20:50 IST2017-01-27T20:40:29+5:302017-01-27T20:50:18+5:30

शिवसेना भाजपची बेगडी युती तुटल्याने आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय सुकर झाला आहे.

Congress defeats Congress by defeating alliance - Ashok Chavan | युती तुटल्याने काँग्रेसचा विजय सुकर - अशोक चव्हाण

युती तुटल्याने काँग्रेसचा विजय सुकर - अशोक चव्हाण

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - शिवसेना भाजपची बेगडी युती तुटल्याने आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय सुकर झाला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

युती तोडण्याच्या उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत अशोक चव्हाण म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी युती तोडण्याच्या वल्गना करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावे. उध्दव ठाकरे म्हणाले की आता युती करण्यासाठी कुणापुढे कटोरा घेऊन जाणार नाही म्हणजे यापूर्वी उध्दव ठाकरे हे कटोरा घेऊन उभे होते हे स्पष्ट झाले असून शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे हे आमचे म्हणणे खरे असल्याचे सिध्द झाले आहे.

राज्याच्या इतिहासातील सर्वात अपारदर्शक सरकार चालवणारे पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहेत. निवडणुकीची गणिते जुळत नाहीत म्हणून वेगवेगळ्या निवडणुका लढवायच्या आणि निवडणुकीतनंतर भ्रष्टाचार करण्यासाठी पुन्हा एकत्र यायचे ही शिवसेना भाजपची कार्यपध्दती आहे. विधानसभा आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाच्या युती नाट्याचे प्रयोग राज्यातील जनतेने पाहिले आहेत.

मुंबई महापालिकेत गेल्या 22 वर्षात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रचंड भ्रष्टाचार केला असून युती तोडून तो झाकला जाणार नाही. राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले असून शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष या भ्रष्टाचारात सामील असल्याचे समोर आले आहे. जनतेमध्ये शिवसेना भाजप विरोधात तीव्र असंतोष असून आगामी निवडणुकांत काँग्रेसचा विजय निश्चित होताच तो आता अधिक सुकर झाला आहे असे खा. चव्हाण म्हणाले. 

Web Title: Congress defeats Congress by defeating alliance - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.