काँग्रेसने दहशतवाद्याला शहीद ठरविले

By Admin | Updated: February 13, 2016 01:50 IST2016-02-13T01:50:53+5:302016-02-13T01:50:53+5:30

दहशतवादी डेव्हीड हेडलीने दिलेल्या साक्षेमधील इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाची सदस्य असल्याची माहिती काँग्रेस पक्षाने न्यायालयापासून लपविली आणि पक्षाच्या हितासाठी दहशतवाद्याला

Congress decided to call martyr the terrorist | काँग्रेसने दहशतवाद्याला शहीद ठरविले

काँग्रेसने दहशतवाद्याला शहीद ठरविले

पुणे : दहशतवादी डेव्हीड हेडलीने दिलेल्या साक्षेमधील इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाची सदस्य असल्याची माहिती काँग्रेस पक्षाने न्यायालयापासून लपविली आणि पक्षाच्या हितासाठी दहशतवाद्याला शहीद ठरविले, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
जावडेकर म्हणाले, पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने न्यायालयासमोर हेडलीची साक्ष देताना त्यातील इशरतची महत्वाची माहितीच दडवली. त्याचा उल्लेखच काढून टाकला. यावरून काँग्रेस पक्षाने न्यायालयापासून माहिती लपविल्याचे हेडलीने दिलेल्या आताच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या सरकारला इशरतला दहशतवादी ठरवायचे नव्हते. तर त्यांना या प्रकरणाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची बदनामी करायची होती आणि त्यासाठी त्यांनी सत्य लपविले. त्यामुळे शहा यांना अनेक वर्षे गुजरातमधून बाहेर आणि काही दिवस तुरूंगातही रहावे लागले होते. पण आता सत्य समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या दोघांची माफी मागायला हवी. हे प्रकरण न्यायालयात आहे आणि लवकरच न्यायालय या घटनेतील सर्व खरी माहिती सर्वांसमोर आणेल. (प्रतिनिधी)

Web Title: Congress decided to call martyr the terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.