वायकर प्रकरणी काँग्रेसने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By Admin | Updated: July 1, 2016 04:01 IST2016-07-01T04:01:57+5:302016-07-01T04:01:57+5:30

शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व भागात अनधिकृत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता मिळविली

Congress chief meets CM in Vayakar case | वायकर प्रकरणी काँग्रेसने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

वायकर प्रकरणी काँग्रेसने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


मुंबई : शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व भागात अनधिकृत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता मिळविली असून, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आरे कॉलनी येथे वायकरांशी संबंधित व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे. तसेच वायकर यांच्यामार्फत सुरू असणारे सर्व एसआरए प्रकल्प थांबविण्यात यावेत. शिवाय, जोगेश्वरी गुंफेजवळ १०० मीटरच्या आत जी इमारत उभारण्यात आली आहे ती पाडून टाकावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. सर्व प्रकरणांची पारदर्शीपणे चौकशी होईल. तुम्ही दिलेली सर्व कागदपत्रे शासकीय यंत्रणेद्वारे तपासून घेऊन लवकरात लवकर निष्पक्षपणे योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे निरुपम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Congress chief meets CM in Vayakar case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.