शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Balasaheb Thorat : "देवेंद्र फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं हा प्रश्नच पडलाय, एका दगडात किती पक्षी मारले?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 14:53 IST

Congress Balasaheb Thorat And BJP Devendra Fadnavis : बाळासाहेब थोरात यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सवाल विचारला आहे. :

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांसह विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकरांनी आजवर केलेल्या कामांचा दाखला दिला. यानंतर बाळासाहेब थोरात (Congress Balasaheb Thorat)यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना (BJP Devendra Fadnavis) सवाल विचारला आहे. फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं?, एका दगडात किती पक्षी मारले? अशी विचारणा केली आहे. 

तुमची आदित्य ठाकरेंशी जवळीक होती. तुम्ही त्यांना कायदा शिकवला. अजित पवारांनी त्यांच्यासोबत असणारं नातं सांगितलं. पण मग तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी विचारला. तसेच अनुभवी सदस्यांना अध्यक्ष बनवण्याची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले? असा प्रश्नही थोरात यांनी यावेळी विचारला. "राज्याचा कारभार इथे चालतो. गेल्या दोन वर्षात सदस्यांना संधी मिळाली नाही. सभागृहाने अनेक मोठी माणसं पाहिली."

"एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आता देवेंद्र  फडणवीस तुमचं अभिनंदन कसं करावं असा प्रश्न पडला आहे. छगन भुजबळांनी उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाकडे तुमचंच लक्ष नव्हतं असं वाटतं आहे" असं बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्याचं हित साधलं जावं ही अपेक्षा असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोबाईलवरील एक मेसेज वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. या टोलेबाजीनंतर सभागृहात एकच हशा पिकला.

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव फडणवीसांनी जाहीर केल्याच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. "फडणवीसांनी शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची घोषणा करताना भाजपाची लोक इतकी रडायला लागली की गिरीश महाजन तर फेटा सोडून डोळ्यालाच लावतो की काय असं झालं होतं. सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांचा मनात धाकधूक आहेच. चंद्रकांतदादा तुम्ही तर बाक वाजवूच नका. कारण तुम्हाला मंत्रीपद मिळेल की नाही याची काही शाश्वती नाहीय", असं अजित पवार म्हणाले आणि विधानभवनात एकच हशा पिकला.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपा