शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:40 IST

Congress Balasaheb Thorat News: मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घुमजाव करत महायुतीने आधी मुख्यमंत्री कोण ते घोषित करावे, असे म्हटले आहे.

Congress Balasaheb Thorat News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कधी लागणार, निवडणुका कधी होणार आणि मतमोजणी कधी असेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. सर्वच पक्षांनी तयारीवर मोठा भर दिला असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी निवडणुकीत कितपत प्रभाव पाडू शकेल, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडीत चर्चांना सुरुवात झाली आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक होती. बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड दिल्लीत गेले आहेत. राहुल गांधी महाराष्ट्राचा आढावा घेणार असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी मीडियाशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातील महायुतीचे महाभ्रष्ट सरकार घालवणे महत्त्वाचे आहे

या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा होण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रातील महायुतीचे महाभ्रष्ट सरकार घालवणे महत्त्वाचे आहे. तो मुख्य उद्देश आमचा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. अद्यापही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आणि जागावाटप अंतिम होताना दिसत नाही, याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, चर्चा सुरू आहे. लवकरच सगळे होईल. याला टाइम लिमिट आहे. या टाइम लिमिटमध्ये गोष्टी कराव्याच लागतात, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी वारंवार मागणी करणारे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत घुमजाव करीत वेगळी भूमिका मांडली. महायुतीने आधी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मग आम्ही आमचा चेहरा जाहीर करतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्या म्हणण्याला दुजोरा दिला. आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका मविआच्या या तीनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस