शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Balasaheb Thorat: राजीनाम्यानंतर प्रथमच बाळासाहेब थोरात सर्वांसमोर आले; एकूणच प्रकरणावर स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 20:24 IST

Balasaheb Thorat: विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Balasaheb Thorat: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून  अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अनेक दिवसांनंतर बाळासाहेब थोरात सर्वांसमोर आले आणि प्रसारमाध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. 

तुमची नाराजी दूर झाली का? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला होता. मात्र, यावर थेट भाष्य करणे बाळासाहेब थोरातांनी टाळल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुव खरगे याच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच के पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले. 

रायपूर अधिवेशनाला जाणार आहे

मागील अनेक दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलेलो नाही. माझा राजीनामा हा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला खूप मोठे केले. माझी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मान्य करण्याचा विषयच येत नाही. बाळासाहेब थोरातांचे पूर्ण ऐकून घेतले. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षांना भेटलो होतो. याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच राज्यात झालेले गैरसमज त्यांच्यापर्यंत पोहोचवले. या समस्या लवकरच सोडवण्यात येतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि थोरात यांची भेट होणार आहे. तसेच थोरात यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, असे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांनी या बैठकीनंतर सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस