कॉंग्रेसने नेहमीच तथ्यहीन आरोप केले - संघाची कॉंग्रेसवर टीका
By Admin | Updated: July 19, 2016 16:11 IST2016-07-19T16:11:52+5:302016-07-19T16:11:52+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वादग्रस्त आरोप करणा-या वक्तव्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना फटकारले. संघातर्फे याचे स्वागत करण्यात आले

कॉंग्रेसने नेहमीच तथ्यहीन आरोप केले - संघाची कॉंग्रेसवर टीका
style="font-family: HelveticaNeue, "Helvetica Neue", Helvetica, Arial, "Lucida Grande", sans-serif; font-size: 16px;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वादग्रस्त आरोप करणा-या वक्तव्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना फटकारले. संघातर्फे याचे स्वागत करण्यात आले असून कॉंग्रेसवर टीका करण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या हत्येसाठी संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी मंगळवारी कॉंग्रेसवर टीका केली. कॉंग्रेसने संघाविरोधात नेहमीच खोटा प्रचार केला आहे. संघावर तथ्यहीन आरोप करुन भ्रम निर्माण करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर कॉंग्रेसची बाजू उघडी पडली आहे, असे डॉ.वैद्य म्हणाले.