कोल्हापूर जिल्हा परिषदेत विजय दर्डा यांचे अभिनंदन

By Admin | Updated: September 20, 2016 21:53 IST2016-09-20T21:53:21+5:302016-09-20T21:53:21+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांचे अभिनंदन करण्यात आले.

Congratulations to Vijay Darda at Kolhapur Zilla Parishad | कोल्हापूर जिल्हा परिषदेत विजय दर्डा यांचे अभिनंदन

कोल्हापूर जिल्हा परिषदेत विजय दर्डा यांचे अभिनंदन

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २० : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांचे अभिनंदन करण्यात आले. सर्व सदस्यांनी यावेळी बाके वाजवून आणि टाळ्यांच्या गजरात अभिनंदनाच्या ठरावाला अनुमोदन दिले.
‘जाएंट्स इंटरनॅशनल’तर्फे शनिवारी (दि. १७) मुंबईतील नरिमन पॉर्इंट येथील ट्रायडंट हॉटेलच्या सभागृहात ४४ व्या जाएंट्स पुरस्कारांचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वितरण झाले. यावेळी पत्रकारितेतील अमूल्य योगदानाबद्दल ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांना प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचा संदर्भ देत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी विजय दर्डा यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला टाळ्यांच्या गजरामध्ये अनुमोदन देण्यात आले.
‘लोकमत’ने घेतलेल्या देशातील पहिल्या संसदीय पुरस्कारांमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांना ‘अभ्यासू आमदार’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन यावेळी करण्यात आले.

Web Title: Congratulations to Vijay Darda at Kolhapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.