ठाकरी शैलीत राज यांच्याकडून मोदी आणि जवानांचे अभिनंदन

By Admin | Updated: September 29, 2016 22:11 IST2016-09-29T22:11:43+5:302016-09-29T22:11:43+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या ठाकरी शैलीमध्ये लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलं आहे.

Congratulations to Modi and the soldiers from Raj Thackeray style | ठाकरी शैलीत राज यांच्याकडून मोदी आणि जवानांचे अभिनंदन

ठाकरी शैलीत राज यांच्याकडून मोदी आणि जवानांचे अभिनंदन

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - उरी दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी काल मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करुन 35-40 जणांचा खात्मा केला. त्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या ठाकरी शैलीमध्ये लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे जवानांचे आणि मोदींचे कौतुक करताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचे श्राद्ध घातले आहेत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि भारतीय लष्कराचे मन:पूर्वक अभिनंदन

दरम्य़ान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही नरेंद्र मोदी यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे.

Web Title: Congratulations to Modi and the soldiers from Raj Thackeray style