कर्डिलेंना दिलेला आशीर्वाद मोदींना महागात!
By Admin | Updated: October 12, 2014 01:50 IST2014-10-12T01:50:00+5:302014-10-12T01:50:00+5:30
खुनाच्या गुनत सहआरोपी असलेले राहुरी मतदारसंघातील भाजपा उमेदवार शिवाजी कर्डिले यांना जाहीर सभेत दिलेला आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागात पडला आहे.

कर्डिलेंना दिलेला आशीर्वाद मोदींना महागात!
>अहमदनगर : खुनाच्या गुनत सहआरोपी असलेले राहुरी मतदारसंघातील भाजपा उमेदवार शिवाजी कर्डिले यांना जाहीर सभेत दिलेला आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागात पडला आहे. या प्रकरणामुळे भाजपाही अडचणीत आली असून मोदींच्या भयमुक्ती आणि स्वच्छ प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. शिवसेनेने तर या प्रकरणावरुन हल्लाबोल केला आहे.
गुरुवारी पंतप्रधान मोदी यांची राहुरीत सभा झाली. अशोक लांडे खून खटल्यात शिवाजी कर्डिले सहआरोपी असून, त्यांच्या मतदारसंघात होणा:या या सभेवर आधीपासूनच विरोधकांनी टीका सुरु केली होती. युवा सेनेने कर्डिले यांच्यावर दाखल विविध गुनंची जंत्रीच पंतप्रधान कार्यालयाला पाठविली होती. सभा करु नये, अशी विनंतीही मोदी यांना करण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा करत मोदी राहुरीत पोहचले. एवढेच नव्हे तर त्यांनी कर्डिले यांना आशिर्वादही दिले. व्यासपीठावरुन बोलताना मोदी यांनी सुशासन, भयमुक्तीचे आश्वासन दिले. मात्र,गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारासाठी त्यांनी मते मागितल्याने भाजपाचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका सुरु झाली आहे. शिवसेना याबाबतच अधिक आक्रमक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामपूरच्या सभेत या मुद्यावरुन मोदींना धारेवर धरले. मोदींनी आपल्या पदाची किंमत कमी करुन घेतली, अशी टीका त्यांनी केली. शनिवारी सेना नेत्या निलम गो:हे यांनी हाच धागा पकडत पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले. याच सभेत मोदी पोहचण्यापूर्वी कर्डिले यांनी विरोधी उमेदवाराबद्दल अपशब्द वापरले होते. महिलांचा सन्मान राखला जाईल, असा दावा भाजपाकडून जाहिरनाम्यात केला जातो. मात्र दुसरीकडे मोदींच्याच सभेत कर्डिले महिलांचा अपमान करतात, यावर गो:हे यांनी तीव्र आक्षेप नोंदविला.या प्रकरणावरुन राज्यात मोदी आणि भाजपा अडचणीत असताना विरोधकांनी हा मुद्दा जोरकसपणो लावून धरला आहे. (प्रतिनिधी)
भ्रष्टाचार, गुन्हेगारी, भयमुक्त व स्वच्छ प्रशासनाची हमी देणारे पंतप्रधान राहुरीत गुन्हेगारांच्या प्रचाराला आलेच कसे? यामुळे मोदींनी आपल्या पदाची किंमत कमी करून घेतली आहे.
-उद्धव ठाकरे
गुन्हेगार असलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि
पुन्हा त्याच सभेत उमेदवार आणखी एक नवीन गुन्हा करतात. महिलांविरुद्ध अपशब्द वापरणा:यांना विशाखा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे.
-निलम गो:हे
मी गुन्हेगार असतो तर देशाच्या पंतप्रधानांनी सभा नाकारली असती़
- शिवाजी कर्डिले, उमेदवार, भाजपा़