शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने नोकरभरती बाबत काढलेला अध्यादेश संदिग्ध; बेरोजगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 13:19 IST

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने राज्य सरकारची आर्थिक कोंडी बेरोजगार युवा वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण

ठळक मुद्देशासनाने आदेश काढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व त्यांच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम नोकरभरती बंदच्या निर्णयामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होणार

प्रशांत ननवरे- बारामती:कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने राज्य सरकारची आर्थिक कोंडी झाली आहे.अगदी शासकीय कर्मचाऱ्यां चे वेतन देताना देखील शासनाची दमछाक होत आहे. त्यातुन बाहेर पडण्यासाठी शासनाने अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत.यामध्ये राज्य सरकारने घेतला नोकरभरती बंदीचा निर्णय बेरोजगांरांवर परिणाम करणारा ठरला आहे.मात्र, नोकर भरती बंदीबाबत शासनाने काढलेला अध्यादेश संदिग्ध स्वरुपाचा आहे.त्यामुळे बेरोजगार युवा वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.शासकीय नोकरभरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेला विशिष्ट वयाची अट असते. जर नोकरभरती काही काळ झाली नाही.तर काही उमेदवारांचे स्पर्धा परीक्षेतील वय निघून जाऊ शकते.  त्यामुळे अशा उमेदवारांना वयामध्ये मुदतवाढ देण्यासंदर्भात सरकारने विचार करण्याची मागणी जोर धरत आहे. अगोदरच महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या अधिक आहे.त्यामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची भर पडणार आहे.नोकरभरती बंदच्या निर्णयामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होणार आहे. नोकरभरती करुन त्यामध्ये विविध पर्याय देण्याची मागणी पुढे येत आहे.महाराष्ट्र शासनाने नोकरभरती करून काही काळ कमी वेतन देणे हा एक पर्यायअसू शकतो. नोकरभरती बंदी संदर्भात शासनाने काढलेला अध्यादेश हा संदिग्ध स्वरुपाचा आहे. कारण राज्यसेवा, पोलीस भरती यासारख्या काही परीक्षांच्या जाहिराती काढून फॉर्म भरले असून ही संपूर्ण प्रक्रिया पुढे होणार आहे की नाही? हे शासनाने स्पष्ट करण्याची देखील मागणी होत आहे.याबाबत येथील सह्याद्री करीअरचे संचालक उमेश रुपनवर यांनी लोकमत शी बोलताना सांगितले , शासनाने नोकर भरती बंदीचा आदेश न काढता वर्ष-दीड वर्षे भरती केली नसती तरी काहीही फरक पडला नसता, येथून मागे देखील काही वर्षांमध्ये भरती प्रक्रिया या झालेल्या नाहीत.परंतु, शासनाने आदेश काढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व त्यांच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. मुळात कोणत्याही नोकरभरतीची प्रक्रिया ही दीड ते दोन वर्षे चालत असते. त्यामुळे सरकारला दोन वर्षानंतरच या उमेदवारांनावेतनाचा खर्च द्यावा लागतो. याउलट विविध परीक्षांच्या फॉर्म फीमधून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होत असतो.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारjobनोकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस