स्टाफ सिलेक्शन परीक्षेत गोंधळ
By Admin | Updated: October 9, 2014 04:55 IST2014-10-09T04:55:30+5:302014-10-09T04:55:30+5:30
स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या परीक्षेस मुंबईच्या विद्यार्थ्यांना चक्क चंद्रपूरचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे

स्टाफ सिलेक्शन परीक्षेत गोंधळ
मुंबई : स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या परीक्षेस मुंबईच्या विद्यार्थ्यांना चक्क चंद्रपूरचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या गोंधळावर परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने परीक्षा केंद्र बदलून मुंबईजवळील परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे.
बुधवारी या परीक्षांचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मुंबई परीक्षा केंद्र म्हणून निवडले असतानाही त्यांना चक्क चंद्रपूर हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. तर पुणे परीक्षा केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांना गोवा परीक्षा केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)