तरर्र अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याचा गोंधळ

By Admin | Updated: January 20, 2015 01:22 IST2015-01-20T01:22:16+5:302015-01-20T01:22:16+5:30

शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कार्यरत पोलीस उपअधीक्षकाने दारू ढोसून कार्यालयातच धिंगाणा घातला. या प्रकरणाची तक्रार फे्रजरपुरा पोलीस

The confusion of the police officer in tears | तरर्र अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याचा गोंधळ

तरर्र अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याचा गोंधळ

फे्रजरपुरा ठाण्यात तक्रार : बिनतारी संदेश कार्यालयातील घटना
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कार्यरत पोलीस उपअधीक्षकाने दारू ढोसून कार्यालयातच धिंगाणा घातला. या प्रकरणाची तक्रार फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. नितीन जुवेकर असे या पोलीस उपअधीक्षकाचे नाव असून उल्लेखनीय म्हणजे यावेळी तो ड्युटीवर होता.
पोलीस निरीक्षक अनिल साखरे यांनी त्याच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे. पोलीस विभागाचे विभागीय बिनतारी संदेश कार्यालय अमरावतीत आहे. येथे कार्यरत पोलीस उपअधीक्षक नितीन जुवेकर हे सोमवारी सकाळी मद्यधुंद अवस्थेत कार्यालयात दाखल झाले. अतिमद्यप्राशनामुळे त्यांचा तोल जात होता. खुर्चीवर नीट बसू शकत नसल्याने त्यांना अन्य अधिकाऱ्यांनी हटकले. मात्र, अधिकाऱ्यांसोबत अरेरावी करीत कार्यालयातील उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनाही त्यांनी असभ्य वागणूक दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अनिल साखरे यांच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. जुवेकर यापूर्वीसुध्दा दारु पिऊन कार्यालयात आल्याची तक्रार १३ जानेवारी रोजी फे्रजरपुरा ठाण्यात करण्यात आली होती.त्यावेळी त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यांना समज देऊन पुन्हा कामावर रुजू करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सोमवारी दाखल तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी जुवेकरविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनिय ८५ तसेच भादंविच्या कलम ५०४ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
हा तर नेहमीचाच प्रकार
एसीपी दर्जाचे नितीन जुवेकर हे नेहमीच नशेत असतात. त्यांची पुणे येथील पोलीस विभागाच्या मुख्यालयात ३ डिसेंबर २०१४ रोजी फॅक्सद्वारे तक्रार करण्यात आली आहे. मात्र पोलीस विभागातील कर्मचारी असल्यामुळे त्यांना कारवाईत मुभा देण्यात येत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अन्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The confusion of the police officer in tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.