शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आयआरसीटीसीच्या ‘खानपान’ दरवाढ अंमलबजावणीत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 05:00 IST

या दरवाढीबाबत रेल्वे आणि ‘आयआरसीटीसी’मध्येच एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट

ठळक मुद्दे‘आयआरसीटीसी’ने शताब्दी, दुरांतोसह सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांमधील खानपानाचे दरवाढ

पुणे : इंडियन केटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने चहा, नाश्ता, जेवणाच्या दरवाढीवरून प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नवीन दरांची अंमलबजावणी दि. १८ नोव्हेंबरपासून बहुतेक सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुरू असल्याचे ‘आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तर रेल्वेने मात्र ही दरवाढ २८ मार्च २०२० पासून लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या दरवाढीबाबत रेल्वे आणि ‘आयआरसीटीसी’मध्येच एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आयआरसीटीसी’ने शताब्दी, दुरांतोसह सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांमधील खानपानाचे दर वाढविण्यात आले आहेत. दि. १८ नोव्हेंबरपासून मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये वाढीव दराने चहा, नाश्ता, जेवण देण्यास सुरूवात झाली आहे. तर शताब्दी, दुरांतो व राजधानी या गाड्यांमध्ये दि. २९ मार्च २०२० पासून वाढीव दरवाढ लागू होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने दि. १५ नोव्हेंबरच्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे. मात्र मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने नवीन दरवाढीची अंमलबजावणी दि. २८ मार्च २०२० पासून होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे. त्यामुळे दरवाढीच्या अंमलबजावणीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनाही याबाबतचे स्पष्टीकरण देता आले आहे. त्यांनी ‘आयआरसीटीसी’च्या अधिकाºयांशी संपर्क साधण्यास सांगितले. ‘आयआरसीटीसी’च्या अधिकाºयांनी मात्र मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये दरवाढ लागू झाली असल्याचे स्पष्ट केले.मध्य रेल्वेचा जनसंपर्क विभाग व आयआरसीटीसी अधिकाºयांच्या माहितीमध्ये तफावत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेगाड्यांमध्ये वाढीव दराप्रमाणे प्रवाशांना अन्नपदार्थ घ्यावे लागत आहेत. मग रेल्वेच्या प्रसिध्दीपत्रकाचे काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. नवीन दरवाढ पॅन्टी कार व डायनिंग कार असलेल्या गाड्यांसाठी आहे. राजधानी, शताब्दी, दुरांतो गाड्यांमधील प्रथम श्रेणी वातानुकूलित आणि एक्झिक्युटिव चेअर डब्यांमधे सकाळचा चहा १५ रुपयांऐवजी आता ३५ रुपयांना आणि एसी २, एसी ३ व चेअर कार डब्यांमध्ये १० रुपयाऐवजी २० रुपयांना मिळेल. दुरांतो एक्सप्रेसमधील शयनयान डब्यांमध्ये हा चहा १० रुपयांऐवजी १५ रुपयांना मिळेल. मेल, एक्सप्रेस गाड्यांमधील चहाच्या दरात बदल करण्यात आलेला नाही. नाश्ता व शाकाहारी जेवणाचे दर अनुक्रमे १० व ३० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. आता प्रवाशांना अनुक्रमे ४० व ८० रुपये मोजावे लागत आहेत. ------------

मेल, एक्सप्रेस गाड्यांमधील सुधारीत दर (कंसात पुर्वीचे)-  नाश्ता (शाकाहारी) - ४० रुपये (३० रुपये)  जेवण (शाकाहारी) - ८० रुपये (५० रुपये)  -----------------संकेतस्थळावर मेनु कार्ड जुनेच‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर मेनु कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. एक्सप्रेस, राजधानी, दुरांतो, शताब्दी गाड्यांमधील नाश्ता जेवणातील मेनु व त्याचे दरही देण्यात आले आहेत. मात्र, या दरांमध्ये नवीन बदलानुसार कसलाही बदल केलेला नाही. त्यामुळेही प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एक्सप्रेस गाड्यांमध्ये नाश्ता, जेवणासाठी वाढीव दर घेतल्यास प्रवाशांकडून संकेतस्थळावरील मेनुकार्ड दाखविले जात आहे. त्यामुळे काहीवेळा वादही होत आहेत. तर काही गाड्यांमध्ये नवीन दराप्रमाणे मेनुकार्डही उपलब्ध करून दिले जात नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ‘आयआरसीटीसी’कडून लवकरच मेनुकार्ड अद्ययावत करण्यात येईल, असे उत्तर दिले जात आहे.सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये नवीन दराप्रमाणे अन्नपदार्थ विक्री करण्यास सुरूवात झाली आहे. दुरांतो, राजधानी, शताब्दी या गाड्यांसाठी अद्याप दरवाढ लागू नाही. - गुरूराज सोना, सहायक व्यवस्थापक, आयआरसीटीसी, पुणे-------------- 

        

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेfoodअन्नpassengerप्रवासी