चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सभेत गोंधळ
By Admin | Updated: January 6, 2016 19:22 IST2016-01-06T19:19:00+5:302016-01-06T19:22:12+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ उडाला. महामंडऴाच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्या पैशांच्या

चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सभेत गोंधळ
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ६ - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ उडाला. महामंडऴाच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्या पैशांच्या हिशेबावरुन हमरी-तुमरी झाली. त्यानंतर दोन्ही गटांमधील सदस्य एकमेकांवर धावून गेले.
चित्रपट मंडळाच्या माजी अध्यक्षांनी केलेल्या १३ लाखांच्या खर्चाचा हिशेब द्या, त्यानंतरच सभा सुरु करा, असा तगादा विरोधकांनी लावला होता. तसेच, या सभेदरम्यान माईक हिसकावून घेणे, घोषणाबाजी करणे आणि एकमेकांवर धावून जाणे, असे प्रकार यावेळी पाहायला मिळाले.
विशेष, म्हणजे मराठी चित्रपट महामंडाळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी वार्षिक सभा कोणत्याही वादाशिवाय पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र सभा सुरु होताच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या गोंधळानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही गटातील वाद मिटल्याचे समजते.