सेनेकडून सरकारचीच उलटतपासणी

By Admin | Updated: November 28, 2015 02:04 IST2015-11-28T02:04:25+5:302015-11-28T02:04:25+5:30

मराठवाड्यातील सततचा दुष्काळ आणि सरकारी उपाययोजनांचा समाचार शिवसेना २८ व २९ नोव्हेंबरला घेणार आहे. सेनेचे मंत्री, नेते, उपनेते मराठवाड्यातील दाहकता अनुभवून त्याचा

Confrontation by the government | सेनेकडून सरकारचीच उलटतपासणी

सेनेकडून सरकारचीच उलटतपासणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील सततचा दुष्काळ आणि सरकारी उपाययोजनांचा समाचार शिवसेना २८ व २९ नोव्हेंबरला घेणार आहे.
सेनेचे मंत्री, नेते, उपनेते मराठवाड्यातील दाहकता अनुभवून त्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.
आठही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून, दोन दिवसांत शिवसेनेचे मंत्री, नेते, उपनेते, पदाधिकारी ७६ तालुके पिंजून काढणार आहेत.
राज्य सरकारच्या योजनांचा झालेला लाभ, लाभार्थींची संख्या, रोजगार हमी योजनेची स्थिती, बेरोजगारीचे प्रमाण, केंद्र सरकारच्या मदतीचे वाटप, जलयुक्त शिवार योजना, टँकरने पाणीपुरवठा, जून २०१६पर्यंत पाण्याच्या परिस्थितीचा अंदाज व
सरकारी यंत्रणेची तयारी, आत्महत्याकेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारची मदत आदी प्रश्नांच्या अनुषंगाने हा दौरा असेल.
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसह इतर घटकांसाठी केलेल्या उपाययोजनांचा काय फायदा झाला, याची पडताळणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Confrontation by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.