भंडाऱ्यात दोन समुदायांत संघर्ष
By Admin | Updated: July 30, 2014 01:16 IST2014-07-30T01:16:16+5:302014-07-30T01:16:16+5:30
रस्त्याच्या अलीकडे असलेल्या खुल्या जागेवर ईदनिमित्त नमाज पठन सुरू होते तर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शीतला माता मंदिर परिसरात भजन कार्यक्रम सुरू होता. नमाज पठनाचा कार्यक्रम

भंडाऱ्यात दोन समुदायांत संघर्ष
भंडारा : रस्त्याच्या अलीकडे असलेल्या खुल्या जागेवर ईदनिमित्त नमाज पठन सुरू होते तर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शीतला माता मंदिर परिसरात भजन कार्यक्रम सुरू होता. नमाज पठनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दोन गटात संघर्षाची स्थिती निर्माण झाली. मंगळवारी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी हा प्रकार कुशलतेने हाताळल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली.
शीतला माता मंदिरसमोर असलेल्या खुल्या जागेवर मस्जिद कमिटीने नमाज पठनासाठी मंडप टाकला होता. तिथे त्यांचे नमाज पठन सुरू होते. परंतु या जागेवर कार्यक्रमाचा विरोध करीत शितला माता मंदिराच्या आवारात हिंदू रक्षा मंच, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी भजनाचा कार्यक्रम सुरू केला. नमाज आटोपल्यावर दोन गटात संघर्ष निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली.
दरम्यान, दुपारी २ वाजता हिंदू रक्षा मंच, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. याप्रकरणी आज भंडारा जिल्हा बंद करण्याचे आवाहन या संघटनांनी केले असून दुपारी १२ वाजता शास्त्री चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)