गुंणवणूक दारांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:47 AM2018-07-11T05:47:48+5:302018-07-11T05:48:02+5:30

बिटकॉईनप्रकरणात नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणाची अतिरिक्त पोलीस महानिरीक्षकांकडून चौकशी करण्यात येईल.

Confiscation of property of deceitful fraud | गुंणवणूक दारांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त करणार

गुंणवणूक दारांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त करणार

Next

नागपूर  - बिटकॉईनप्रकरणात नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणाची अतिरिक्त पोलीस महानिरीक्षकांकडून चौकशी करण्यात येईल. तसेच दोषींची संपत्ती तीन महिन्यात जप्त करण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले.
सदस्य हेमंत टकले, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , अमरसिंह पंडित आदींनी बिटकॉईनबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
गुंतवणूकदारांना दरमहा बिटकॉईनच्या स्वरूपात १५ टक्के लाभांश देण्याचे आमिष देऊन कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांसह आठ हजार लोकांची ६५ कोटींची फसवणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावर उत्तर दिले. केसरकर म्हणाले, की राज्यात गुन्हे दाखल झाले असतील, ती सर्व प्रकरणे एकत्रित केली जातील. त्यावर एसआयटी नेमून त्याची चौकशी करण्यात येईल. गरज पडल्यास यावर ईडीचीही मदत घेण्यात येईल.
नागरिकांनी या प्रकरणात फसू नये, यासाठी प्रचार मोहीमही राबण्यात येईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या प्रचारातून नागरिकांनी आपले पैसे गुंतवणूक करू नये, असेही सांगण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावर सदस्यांनी आक्र मक भूमिका घेतली होती.

Web Title: Confiscation of property of deceitful fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.