दोन जिवंत काडतुसांसह देशी कट्टा जप्त

By Admin | Updated: June 1, 2014 23:44 IST2014-06-01T23:34:19+5:302014-06-01T23:44:43+5:30

बुलडाणा गुन्हे शाखेच्या पथकाने एका इसमाकडुन देशी कट्टय़ासह दोन जिवंत काड तुसे जप्त केलीत.

Confiscating native cotton with two live cartridges | दोन जिवंत काडतुसांसह देशी कट्टा जप्त

दोन जिवंत काडतुसांसह देशी कट्टा जप्त

अमडापूर : बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका इसमाकडुन देशी कट्टय़ासह दोन जिवंत काडतुसे आज रविवार रोजी जप्त केलीत. बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक नायगाव बु. येथील चोरीचा त पास करण्यासाठी अमडापूर येथे असता नायगाव बु. येथील चंद्रसिंग नरसिंग खुर्दे (वय ३५) या इसमाने पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार पोलिस प थकाच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला देशी कट्टय़ासह दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्याला तत्काळ अटककेली व त्याच्या विरूद्ध कलम ३ (१) २५, आर्म अँक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला.

Web Title: Confiscating native cotton with two live cartridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.