नितीन साठे मृत्यू प्रकरणी शवविच्छेदनावर गोपनीयता
By Admin | Updated: June 4, 2015 04:15 IST2015-06-04T04:15:50+5:302015-06-04T04:15:50+5:30
कोतवाली पोलिसांनी संशयित म्हणून पकडलेल्या नितीन साठेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना त्याचा सविस्तर

नितीन साठे मृत्यू प्रकरणी शवविच्छेदनावर गोपनीयता
अहमदनगर : कोतवाली पोलिसांनी संशयित म्हणून पकडलेल्या नितीन साठेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना त्याचा सविस्तर शवविच्छेदन अहवाल थेट सीआयडीलाच प्राप्त झाला आहे. त्याविषयी अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे.
साठेचा शवविच्छेदन अहवाल मिळाला की नाही? मिळाला असेल तर त्यामध्ये कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला? याबाबत कोणतीही माहिती देण्यास ‘सीआयडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. ही
प्रक्रिया अत्यंत गोपनीय असून पुरावे आणि साक्षीदार यांचे जबाब
घेण्याचे काम सुरू आहे. साठेच्या
मृत्यू प्रकरणाचे निष्कर्ष लवकरच
हाती येतील, असे सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.सीआयडीकडून साठेच्या मृत्यू प्रकरणाची दोन आठवडे चौकशी सुरू राहणार असल्याचे समजते. कोतवाली पोलिसांनी नितीन साठेला २७ मे रोजी संशयित म्हणून पकडले होते. २८ मे रोजी तो कोतवाली पोलीस ठाण्यातून पळून गेला होता. त्याला पुन्हा पोलिसांनी पकडून आणले होते.(प्रतिनिधी)