संमेलन पंजाबात, ग्रंथप्रदर्शन मात्र महाराष्ट्रात
By Admin | Updated: July 10, 2014 01:58 IST2014-07-10T01:58:04+5:302014-07-10T01:58:04+5:30
मराठी प्रकाशकांनी या संमेलनावर बहिष्कार टाकत राज्यात स्वतंत्र गं्रथ प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे.

संमेलन पंजाबात, ग्रंथप्रदर्शन मात्र महाराष्ट्रात
पुणो : पंजाबात होणा:या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी वाचक अल्प प्रमाणात येण्याची भीती असल्याने, मराठी प्रकाशकांनी या संमेलनावर बहिष्कार टाकत राज्यात स्वतंत्र गं्रथ प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. दर्जेदार आणि विविधरंगी पुस्तकांची विक्री व्हावी आणि त्याची वाचकांना मेजवानी मिळावी, हाच हेतू गं्रथ प्रदर्शनाचा असतो, मात्र तो पंजाबमधील संमेलनात साध्य होणार नसल्याचे कारण मराठी प्रकाशक परिषदेने दिले आहे.
संत नामदेवांच्या कर्मभूमीत म्हणजेच पंजाबमधील घुमान गावी यंदाचे 88 वे साहित्य संमेलन होणार आहे. परंतु तेथे मराठी भाषिकांची संख्याच अत्यल्प असल्याने संमेलनाला किती मराठी साहित्यप्रेमी येतील याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत मराठी पुस्तकांची विक्री होणो कठीणच आहे. म्हणूनच प्रकाशकांनी या संमेलनस्थळाविषयी नाराजी व्यक्त करून तेथे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. संमेलनात भरविण्यात येणा:या ग्रंथ प्रदर्शनासारखेच प्रदर्शन राज्यात 4 ते 5 ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे मराठी प्रकाशक परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी सांगितले. संमेलन स्थळ निवडण्याचा अधिकार मराठी साहित्य महामंडळालाच आहे. परंतु, यंदाच्या संमेलनस्थळी आमच्या पुस्तकांची विक्री होणो दुरापास्त आहे. तसेच भौगोलिक अंतरामुळे तेथे जाऊन स्टॉल लावणो परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही तेथे जाणार नाही. त्याचा आम्हाला जो व्यावसायिक
फटका बसणार आहे त्याची भरपाई म्हणून आम्ही राज्यात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणार आहोत, असे जाखडे म्हणाले. हा निर्णय संमेलनाला समांतर नाही, असे स्पष्ट करत बैठक घेऊन प्रदर्शनाचे वेळापत्रक निश्चित करणार असल्याचेही जाखडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)